29 April 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

महिला सुरक्षेवरून ट्विट; पण त्यातही काँग्रेसच्या काळातील योजना फडणवीसांची असल्याचा उल्लेख

Amruta fadnavis, CM Uddhav Thackeray

मुंबई:  ‘महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार ऍसिड हल्ल्याच्या घटना घडल्या असून हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आता आपण आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक’, असल्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवर अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे एका महिला प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तर, औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यातील एका महिलेच्या घरात शिरून एकाने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या पीडित महिलेचा बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनांचा उल्लेख अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

मात्र सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, सूचना आणि मार्गदर्शक तत्वानुसार तत्कालीन काँग्रेस सरकारने बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्रात दिनांक २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली होती. मात्र याच योजनेचा ट्विट’मध्ये उल्लेख करताना सदर योजना अमृता फडणवीस यांनी फडणवीस सरकारच्या काळातील असल्याचं चुकीचं ट्विट केलं आहे. कारण फडणवीस सरकारने त्याची केवळ सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली होती, जी न्यायालयाच्या निर्देशानुसारच होती.

त्यानंतर सिल्लोड जळीतकांडातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला आगीत ९५ टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते यास अटक केली असून, त्याला १० फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित महिला घरात एकटीच राहायची. २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गावातील संतोष मोहिते तिच्या घरी आला. तो अवेळी घरी आल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. संतोषने पीडित महिलेस मारहाण करून रॉकेल ओतून पेटवले व घराची कडी लावून पळून गेला होता.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर यापूर्वी टीका केली होती. फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. या तीनही पक्षांना भाजप हटाव पाहिजे, त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करत आहेत. आधीच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील होती. त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, राज ठाकरे यांनी पक्षासाठी नवीन दिशा पाहिली कौतुक वाटते आहे. ते खूप चांगलं काम करतील, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचंही स्वागत केलं होतं.

 

Web Title:  Former CM wife Amruta Fadnavis appeal Chief minister Uddhav Thackeray over women security.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x