29 April 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मातोश्री बाहेर मनसेची पोस्टरबाजी; वांद्र्यातील बांगलादेशी-पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे साफ करा

CM Uddhav Thackeray, Matoshri, MNS Posters

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्र्यातील मातोश्री घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमधून थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आलं आहे. वांद्र्यात जे काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे आहेत ते साफ करा, असं आवाहन या पोस्टरमध्ये केलं आहे. मनसेचे पदाधीकारी अखिल चित्रे यांनी हे होर्डिंग लावले आहे.

मुख्यमंत्री त्यांनी वांद्रे येथील अंगणातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करावेत. या अशा आशयाचे पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री मुंबतील वांद्रे पूर्वेत मातोश्रीच्या बाहेर लावले. परिणाम वांद्रे परिसरात काही काळ तणावाचे पसरले होते. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्तानातून हाकलंलच पाहिजे हीच भूमिका असेल तर प्रथम वांद्रातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले आधी साफ करा अशा आशयाचे फलक मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी लावले आहेत.

 

तत्पूर्वी मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगव्या राजकारणाला अनुसरून शिवसेनेला पोस्टरबाजी करून घायाळ करत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आला होता.

त्यावर ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं आहे. सेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आला होता. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची राजकीय वाटचाल करणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा रंगली होती.

 

Web Title:  MNS poster in front of Matoshri Residence of CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x