26 April 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का?
x

त्याने जगाला 'कोरोना'बाबत सावध केलं; त्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी

Chinese Doctor Li Wenliang, Corona Virus in Wuhan

वुहान: चीनमध्ये ‘कोरोना’ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे.

कोरोनाची प्रथम लक्षणे या ली यांना दिसली होती. यावरून त्यांनी कोरोना व्हायरसची चीनमध्ये लागण झाल्याची माहिती दिली होती. पण दुर्दैव म्हणजे याच कोरोनाने ली यांचा जीव घेतला. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. डॉ. ली वेनलियांग यांच्यासह आठ जणांनी चीनमध्ये कोरोना विषाणू पसरत असून हा आजार जीवघेणा असल्याचे जाहीर केले होते. पण भयंकर प्रकारे पसरलेल्या कोरोनाने चक्क डॉक्टर ली यांनाच आपल्या विळख्यात अडकवले. इतर डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याला अपयश येऊन वुहान येथे ली यांचा मृत्यू झाला आहे.

एका कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने डॉक्टर ली वेनलियान्ग यांनाही या विषाणूची लागण झाली. त्यानंतर १२ जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. डॉक्टर ली वेनलियान्ग यांनी गेल्या वर्षी ३० डिसेंबरला एका चॅट ग्रुपमध्ये इतर डॉक्टरांना एक मेसेज केला होता. यामध्ये कोरोना विषाणूच्या धोक्याबाबत त्यांनी इतर डॉक्टरांना माहिती दिली होती. तसेच, या विषाणूची लागण होण्यापासून वाचण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घाला, असंही त्यांनी डॉक्टरांना सांगितलं.

चीननं गुरुवारी स्पष्ट केलं की चीमध्ये राहाणाऱ्या १९ विदेशी नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. पण त्यांनी नागरिकांच्या देशाचा उल्लेख केलेला नाही. चीनच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत ५६३ जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण २८,०१८ लोकांना व्हायरसची लागण झालीय. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात ७३ लोकांचा जीव गेला आहे.

 

Web Title:  Chinese Doctor Li Wenliang dead due to danger Corona Virus in Wuhan.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x