वुहान: चीनमध्ये ‘कोरोना’ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये याचा वेगाने प्रसार होतं आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून चिनी सरकारने बाधित तसेच संशयित नागरिकांना रहदारीच्या मार्गावरून तसेच घरातून खेचून घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे.
#CoronaVirus – चीन’मध्ये बाधित लोकांना अक्षरशः जनावरांप्रमाणे भर रस्त्यात आणि घरातून पकडून घेऊन जाण्यात येतं आहे. pic.twitter.com/nBZir57Dmd
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) February 7, 2020
#CoronaVirus – चीन’मध्ये बाधित लोकांना अक्षरशः जनावरांप्रमाणे भर रस्त्यात आणि घरातून पकडून घेऊन जाण्यात येतं आहे. pic.twitter.com/89TqhKFQAf
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) February 7, 2020
कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आलं होतं.
Web Title: Chines government is taking corona affected peoples into health custody.
