29 April 2024 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

RSS'ची कार्यालये आणि वरिष्ठ पदाधिकारी दहशतवाद्यांच्या रडारवर, सुरक्षेत वाढ

RSS, attacked by top Global Terror Groups

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते आणि त्यांचे कार्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला आहे. जागतिक दहशतवादी संघटना हल्ल्यासाठी आयईडी किंवा आयईडी (व्हीबीआयईडी) चा वापर करु शकतात. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, हा हल्ला महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आदी राज्यात होऊ शकतो.

या महिन्यात गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अहवालात हा नवीन दावा करण्यात आला आहे. जागतिक दहशतवादी संघटनांशी निगडीत दहशतवादी येणाऱ्या दिवसांत संभवतः आयईडी किंवा व्हीबीआयईडीचा उपयोग करुन आरएसएसची कार्यालये आणि त्यांच्या नेत्यांना तसेच पोलिस ठाण्यांवर हल्ला केला जाऊ शकतो.

IED किंवा VBIEDs ( Vehicle-Borne Improvised Explosive Device) अशा अत्याधुनिक तंत्राचा वापर करत हा हल्ला होऊ शकतो. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये हा हल्ला होऊ शकतो अशी माहितीही गुप्तचर सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्रात नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे ज्येष्ठ नेते तिथं वास्तव्याला असतात. त्यामुळे या माहितीने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवली आहे.

दरम्यान बंगळुरु पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या निशाण्यावर कोण कोण हायप्रोफाईल नेते आहेत. कोणाला निशाणा बनवणार आहे याबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती आणि बंगळुरु येथे घडलेल्या घटनेवरुन आरएसएस आणि हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने सर्व पोलीस दलाला अलर्ट करण्यात आलं आहे.

 

Web Title: Intel input claims RSS offices leaders can be attacked by top Global Terror Groups.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x