रायपूर : सध्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून आज छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान सुरु आहे.

तर दुसरीकडे छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा २ टप्प्यांत मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने निश्चित केले होते. तसेच छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरु झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असल्याचे वृत्त आहे. तर राजनंदगाव येथील एकूण ५ मतदारसंघात आणि बस्तर येथील तीन मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

chhattisgarh assembly election 2018 first phase voting started since morning