5 May 2024 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

मनसेचा भगवा फडकला आणि पुणे कात्रजमधील बच्चे कंपनीची 'फुलराणी' पुन्हा धावली

Pune Katraj Fulrani Train, MNS Corporator Vasant More, Raj Thackeray

पुणे: लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली पेशवे उद्यानाती‌ल फुलराणी मिनी ट्रेन २०१४ मध्ये कात्रजमध्येही धावण्यास सुरुवात झाली होती. कात्रज परिसरातील आजी-आजोबा उद्यानातील ५०० मीटरच्या ट्रॅकवर धावणाऱ्या ‘फुलराणी’च्या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ५३ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चाला मे २०१४ मध्ये मंजुरी दिली होती.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या मागील बाजूला असलेल्या कात्रजच्या तलावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा तसेच या भागात संगीत कारंजे, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा पाटलांचा वाडा, शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राची ओळख करून देणारे ग्रंथसंग्रहालय अशी अनेक आकर्षणे असल्याने त्यामध्ये ‘फुलराणी’ने अधिक भर टाकली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्या पुढाकारातून हा ‘फुलराणी’चा प्रकल्प उभारण्यात आला होता. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे एकूण दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी २०१३ मधील बजेटमध्ये ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही फुलराणी ट्रेन तयार करण्याचे काम अमरावती येथे करण्यात आले होते.

या रेल्वेसाठी साडेचारशे मीटर लांबीचा लोहमार्ग बांधणे, एक छोटे स्टेशन उभारणे, बोगदा बांधणे ही कामे प्रलंबित असून, यासाठी मे २०१४ मध्ये स्थायी समितीच्या बैठकीत ५३ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर पुढील नियोजित २ ते ३ महिन्यांत फुलराणी प्रत्यक्षात धावू लागली होती.

मात्र पुणे महानगरपालिकेला प्रति वर्षी २७ लाख रु महसूल मिळवून देणारी कात्रज तलावा’वरील ही फुलराणी ट्रेन मागील ५ महिन्यांपासून बंद होती. मात्र मनसेचे स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महानगपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अनोखं आंदोलन केलं आणि त्यानंतर आज मनसेच्या भगव्या झेंड्याच्या साक्षीने तीच ‘फुलराणी’ आज बच्चे कंपनीसोबत मौज-मजा करण्यासाठी सज्ज झाल्याने नगरसेवक वसंत मोरे यांच्या कामाचं तसेच पाठपुराव्याच कौतुक होताना दिसत आहे.

 

Web Title: Story Pune Katraj Fulrani Mini Train started again after MNS Corporator Vasant More Followup.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x