4 May 2025 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

चिनी ‘कोरोना’ भीती; शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ११०७ अंकानी कोसळला

BSE, NSE, Stock Market

मुंबई: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात ११०७. ४१ अंकाची मोठी घसरण झाली. शेअर बाजार सुरु होताच आठवड्याच्या शेवटच्या दिवसाची सुरुवातच खराब झाली. सेन्सेक्स ११०७. ४१अंकांनी घसरुन ३८, ६३८ वर आला. टेक महिंद्रा, टाटा स्टील आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालेली पहायला मिळाली. तर निफ्टी ३०० अंकांनी कोसळून ११,३३३ वर स्थिरावला.

चीनमधून उत्पत्ती झालेल्या कोरोनाव्हायरसचा जगभरात फैलाव होण्याची भिती आहे. असे घडल्यास, त्याचा जागतिक उत्पादन, विकासावर मोठा परिणाम होईल. गुंतवणूकदारांमध्ये त्याच गोष्टीची भिती आहे. त्याचाच परिणाम शेअर बाजारावर होत आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि इराण या देशांमध्येही कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळले आहेत.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड व रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेयर्स खाली आले आहेत. दुसरीकडे टायटन, एनटीपीसी, नेस्ले इंडिया आणि कोटक बँक यांचे शेअर्स नफ्यात सुरू आहेत. रेल्वे सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या अधिकारातील १० टक्के हिस्सा विकण्याच्या विक्रीची सुरूवात (ओएफएस) गुरुवारी झाली आहे.

 

 

News English Summery: The Corona virus has hit the stock market worldwide. The result is that big economies like China are sitting, but now it is being feared that India is falling into the trap too. The picture changed in just five minutes after the stock market started. Shares of major companies like Tech Mahindra, Tata Steel, Bajaj Finance, Infosys, ONGC, Mahindra and Mahindra have fallen. The Sensex of the Mumbai stock market fell for the sixth consecutive day.

 

Web Title: Story Sensex Stock Market falls over 1000 points at opening.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या