20 May 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Yarn Syndicate Share Price | असे शेअर्स निवडून श्रीमंत व्हा! यार्न सिंडिकेट शेअरने मागील 3 वर्षात 1365% परतावा दिला, किंमत 32 रुपये

Yarn Syndicate Share Price

Yarn Syndicate Share Price | यार्न सिंडिकेट या सरकार मान्यताप्राप्त व्यापारी निर्यातदार आणि विविध प्रकारचे सूत, कच्चा कापूस आणि फॅब्रिक इत्यादींचा निर्यात व्यापार करणाऱ्या कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांनी स्टिच्ड टेक्सटाइल लिमिटेड कंपनीमधील 51 टक्के भाग भांडवल 38-39 कोटी रुपये गुंतवणूक करून खरेदी केले आहे.

Stitched Textile Limited ही कंपनी भारतातील अग्रगण्य पुरुषांचा पोशाख फॅशन ब्रँड म्हणून ओळखली जाते. ही कंपनी भारतातील 100 पेक्षा अधिक किरकोळ दुकानांमध्ये पुरुषांचे बार्सिलोना ब्रँडचे कपडे विकण्याचा व्यवसाय करते. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी यार्न सिंडिकेट स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 32.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

यार्न सिंडिकेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स भारतातील विविध रिटेल व्यवसायातील भाग भांडवल संपादन करून रिटेल विभागात व्यवसाय विस्तार करत आहे. यार्न सिंडिकेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरणीसह 35.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यार्न सिंडिकेट कंपनीचे शेअर्स 21 ऑक्टोबर 2022 रोजी 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याकाळात हा स्टॉक आतापर्यंत 300 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षांत, यार्न सिंडिकेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 698 टक्के नफा कमावून दिला आहे.

स्टिच्ड टेक्सटाइल्स कंपनीने नुकताच वीरू रिटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. वीरू रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागच्या मालकीची कंपनी आहे. यार्न सिंडिकेट ही कंपनी पुढील काळात रिटेल क्षेत्रात आपला व्यवसाय आक्रमकपणे विस्तार करत आहे. यार्न सिंडिकेट लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक राईट इश्यूद्वारे भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचे प्रवर्तक आपले भाग भांडवल कमी करून निधी उभारणार आहे.

मागील एका वर्षात यार्न सिंडिकेट कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 960 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स 1365 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yarn Syndicate Share Price today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

Yarn Syndicate Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x