29 April 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

एकावर एक राज्य भाजपमुक्त होतं असल्याने मध्यप्रेदशात पुन्हा आमदारांची खेरदी?

Madhya Pradesh Government, Operation Lotus

भोपाळ : मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला. येथील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे.

आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी हालचाल सुरु केली आहे. तसा काँग्रेसने थेट आरोपही केला आहे. त्यामुळे भाजपचे सत्ता स्थापनेचे नवे मिशन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काँग्रेसने भाजपावर कमलनाथ सरकार पाडण्याचा आणि आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोपही केला. त्यानंतर काँग्रेस पक्ष अलर्ट झाला आणि अखेर मध्यरात्री आमदारांची गुरूग्रामच्या हॉटेलमधून सूटका केली व निःश्वास टाकला.

याआधी, “भाजपाने 8 आमदारांना गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड भारत या हॉटेलमध्ये ओलीस ठेवलंय. कमलनाथ सरकारचे मंत्री जीतू पटवारी आणि मंत्री जयवर्धन सिंह ओलीस ठेवलेल्या आमदारांची सूटका करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचलेत, पण त्यांना आमदारांची भेट घेऊ दिली जात नाहीये. हॉटेलमध्ये सुरक्षेसाठी हरयाणा पोलिसांना तैनात करण्यात आलंय. ओलीस ठेवलेल्यांमध्ये चार आमदार काँग्रेसचे, दोन आमदार बहुजन समाज पक्षाचे, एक आमदार समाजवादी पक्षाचा आणि अन्य एक आमदार अपक्ष आहेत”, असा आरोप आजतक या वृत्तवाहिनीसोबत बोलताना मध्य प्रदेशचे अर्थ मंत्री तरुण भनोट यांनी केला. त्यानंतर ते स्वतःही आमदारांची भेट घेण्यासाठी गुरुग्रामच्या आयटीसी हॉटेलकडे निघाले.

दिग्विजय सिंह हेदेखील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत, तिथे हॉटेल प्रवेशाबद्दल व्यवस्थापनांशी त्यांचा बराच वाद झाला. यानंतर बसपाचे आमदार रामबाई यांच्यासमवेत मंत्री जयवर्धन सिंह सोबत दिसले. काँग्रेसचा आरोप आहे की, आमदार बिसाहुलाल यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार भाजप नेत्यांसह ओलीस ठेवले आहेत. तर भाजप आमदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांना सत्तेची हाव आहे. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून कटकारस्थानं आखली जात आहेत. मात्र यात ते यशस्वी होणार नाहीत. आम्ही हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहोत. मीदेखील त्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे. बहुजन समाज पार्टीच्या आमदार रमाबाई माझ्यासोबतच आहेत, अशी माहिती पटवारी यांनी दिली.

दिग्विजय सिंह यांनी भाजपवर सरकार अस्थिर असल्याचा आरोप केला. हरियाणामधील भाजप सरकारमुळे भाजप नेत्यांनी हे हॉटेल निवडलं. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय गोंधळ उडाला आणि भोपाळ ते दिल्ली आणि गुडगावपर्यंत गोंधळ उडाला आहे.

 

English News Summery: Madhya Pradesh is once again gaining momentum. BJP is being structured to defeat the Congress government here. It has been alleged that the BJP is doing the work of throwing the MLA. Earlier in the state of Karnataka and Goa, the BJP has set up its own government, pushing the Congress. Now a movement has been started to oust the Congress government in Madhya Pradesh. The Congress has also made a direct allegation. Therefore, talk of a new mission of establishment of BJP has started in the political circle. The Congress also accused the BJP of destroying the Kamal Nath government and scamming the MLAs. The Congress party was alerted and finally rescued the MLAs from the Gurugram hotel at midnight.

 

Web News Title: Story Madhya Pradesh BJP Toppling 8 MLAs inside Gurugram hotel congress Kamal Nath government trouble.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x