आलात का माझ्या दर्शनाला सर्वे ? दमला असाल..आराम करा..या कलियुगात ही विट सोडून मला काही हलता येईना. रुक्मिणी सुद्धा म्हणते घेऊया की अवतार पुन्हा या काळ्या मातीत..पण तिला कस समजाउ कलियुगात लोक देवाला सुद्घा नाव ठेवायला पुढे मागे पाहत नाहीत.
चांगले लोक त्रास सहन करतात. मि निदान माझ्या या मूर्ति दर्शनाने तरी त्याना समाधान देतो. या कलियुगात वारी ची परंपरा तुम्ही जपत आहात त्याचा आनंद आहे. जशी तुम्हाला या विठुरायाची आठवण येत असते माझ सुद्धा तसच आहे मला सुद्धा या एकादशीची ओढ़ लागून असते. पण फ़क्त वारिला येऊन माझी शिकवण आठवणे आणि बाकी वेळेस ती विसरुन जाणे हा वारीचा संदेश नव्हे. मीच त्रिकाल बाधित सत्य आहे बाकी सगळ नश्वर आहे.
विश्वाच्या नश्वर गोष्टीच्या मोहात पडुन न जाता माझे नाम स्मरण केल तर मन शांत राहणार. गावोंगावी च्या पालख्या तुम्ही माझ्या दर्शनाला घेऊन येतात त्यानिमित्ताने माझी तुम्हा सर्वांशी भेट होते. माया बहिणीच्या अब्रुचि काळजी घ्या, माणुसकी धर्म पाळा, माणसात देव शोधा, चंगुलकीच्या मार्गावर चाला, कठीण काळात हार मानु नका, नाहीतर मि आहेच …विटेवर उभा तुम्हा सर्वांसाठी.. !!
लेखक: अचल गैधर