किती कठीण असत नाही
कुणावर प्रेम करण
कुणाच्या तरी आठवणीत
मनातल्या मनात घुटमळण
कुणासाठी तरी रोज साजन
आयुष्याची स्वप्न रंगवण
कुणालातरी खूप सतवण
अन गालातल्या गालात हसन
मिटलेल्या पापण्यात कुणालातरी पाहन
अन स्वताशीच खुदकन हसन
कुणासाठी तरी उशीत खूप रडण
अन कुणासाठीतरी रोज झुरण
ते फक्त एक स्वप्न होत
स्वतालाच समजावून सांगण
‘स्वत:च’ आयुष्य माझ कधीच नव्हत
कुणाचतरी स्वप्न म्हणूनच आता तुटण
लेखक: पियुष खांडेकर
