कोरोना आपत्ती: सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय नाही: मुख्यमंत्री
मुंबई, १७ मार्च : देशातल्या वाढत्या प्रादुर्भावाचं महाराष्ट्र केंद्र बनत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शहरं बंद करायची का, वाहतूक व्यवस्था बंद करायची का याविषयी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात ३९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनानं सुरूवातीच्या टप्प्यात शाळा, महाविद्यालयांना सुटी, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह गर्दी होणाऱ्या संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले.
करोनाचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत राजधानी, डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. करोना संसर्ग टाळणे आणि प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत या गाड्या रद्द राहणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे सेवेसह सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला रेल्वेचे अधिकारीदेखील उपस्थित आहेत. रेल्वे, मेट्रो, बस सेवा पूर्णपणे बंद केली जाणार की त्यांची संख्या काही प्रमाणात कमी केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज सकाळीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबद्दलचे संकेत दिले होते. रेल्वे, मेट्रोचा विषय थेट माझ्या खात्याशी संबंधित नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं टोपेंनी सांगितलं होतं.
News English Summery: Maharashtra is becoming the center of the increasing prevalence in the country. The state government has taken huge steps to curb the spread of this deadly virus. An urgent meeting of the cabinet was called to close the cities or to close the transportation system. It has not yet been decided on the transport system. But no decision has been made to close the government office, he said.
News English Title: Story government offices close 7 days state government takes big decision curb Corona virus crisis News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
- Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता
- Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी