30 April 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

चला बाहेर या...मोकळ्या जागेत शिंका...कोरोना पसरवा म्हणणाऱ्याची नोकरी गेली

Infosys Employees, Corona Virus, Corona Crisis

बंगळुरू, २८ मार्च: जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत इन्फोसिस कंपनीतील एका इंजिनियरने धक्कादायक ट्विट केलं आणि सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर इन्फोसिस कंपनीने सर्व पडताळणी करून संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.

इन्फोसिसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संबंधित कर्मचाऱ्याने त्याच्या सोशल हँडलवर केलेले ट्विट कंपनीच्या नियमावलीचे उल्लंघन करणारे आहे. कंपनीने या संदर्भात सर्व चौकशी पूर्ण केली आहे. कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यानेच ती पोस्ट टाकल्याची खात्री पटल्यानंतरच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशा स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये कंपनी कोणतीही चुकीची वर्तणूक अजिबात खपवून घेणार नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने कामावरून काढून टाकण्यात येत आहे.

मागील गुरुवारी या कर्मचाऱ्याने त्याच्या ट्विटर हँडलवर हे एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्याने घरातून बाहेर पडा. एकमेकांच्या हातात हात द्या आणि विषाणूचा फैलाव वाढवा, असे म्हटले होते.

 

News English Summary: The Corona virus has caused widespread outbreaks worldwide and has killed more than 24,000 patients worldwide. In India too, the infection is increasing and so far, more than 750 people have been infected with coronary infection in India. Today is the fourth day of the lock down, and all Indians have been catching up to the situation of Corona. In such a case, an engineer from Infosys Company made a shocking tweet and there was a stir. The Infosys company has since removed all relevant employees from the job. Infosys said in a tweet from its official Twitter handle that a tweet by a concerned employee on its social handle was in violation of the company’s rules. The company has completed all inquiries in this regard. The action was taken only after a company employee was convinced that the post was dropped. In such cases, the Company will not absorb any misconduct at all. Therefore, the employee is being removed from work with immediate effect.

 

News English Title: Story Infosys employee says spread the corona virus in social post company sacks by company news latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x