8 May 2025 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

सावधान! देशात करोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला ३,३७४वर, ७७ जणांचा मृत्यू

Covid19, Corona Crisis, India Corona Crisis

नवी दिल्ली, ५ एप्रिल: भारतात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे, मात्र दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या १२ तासांच देशात या विषाणू बाधितांचे ३०२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यविभागानं दिली आहे.

दरम्यान, देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता ३३७४ वर पोहोचला आहे. तर यामुळे ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण ३३७४ रुग्णांपैकी ३०३० रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. तर २६७ रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतात गेल्या १२ तासांमध्ये ३०२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

दुसऱ्याबाजूला कोरोनाच्या लढ्यासाठी भारत क्षणोक्षणी सुसज्ज होत आहे. गेल्या १५ दिवसांत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेनुसार विविध राज्यांनी १ लाख ३४ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे तर ३१ हजार निवृत्त, खासगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने मदतीची तयारी दाखवली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच एअर इंडिया व खासगी ९७ विमानांच्या मदतीने ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभर १९० टन साहित्य पोहोचवण्यात आले. त्यात वैद्यकीय उपकरणे, मास्क, औषधी तसेच व्हेंटीलेटरचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढल्यास काय करावे, आरोग्य व्यवस्थापन कसे असेल, यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला होता, असेही अगरवाल म्हणाले.

 

News English Summary: The number of coronary arteries in the country has increased to 3374. So 77 people have lost their lives. Out of a total of 3374 patients, 3030 patients are positive. Of the 267 patients tested positive, they were discharged from the hospital. Also, 77 people have died. Meanwhile, there has been an increase of 302 new patients in the last 12 hours in India, the Union Health Ministry said.

 

News English Title: Story increase of 302 Covid19 cases in the last 12 hours in India Corona Crisis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या