8 May 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग-बॉटलिंग, वस्त्रोद्योग उद्योगांना लॉकडाउन'मधून वगळण्याची मागणी

Covid19, Corona Crisis, Lock Down

नवी दिल्ली, ०९ एप्रिल: जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा आता ५ हजार ७३४ वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात करोनाने १७ चा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६६ झाली आहे.

करोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या ५ हजार ७३४ जणांमध्ये अद्याप उपचार सुरू असलेले ५ हजार ०९५ जण, उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले ४७३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची १६६ ही संख्या समाविष्ट आहे.

दरम्यान, मागील महिन्यात २४ तारखेला रात्री लॉकडाऊन लागू झाला. त्यावेळेपासून देशात फक्त औषध निर्मिती कंपन्यांना आपले उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण आता इतरही काही महत्त्वाचे आणि नाशवंत वस्तूंवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग-बॉटलिंग, वस्त्रोद्योग यांचे काम सुरू करण्यासाठी परवानगी दिली जावी, अशी मागणी पुढे येत आहे. अर्थात सोशल डिस्टन्सिंग सांभाळून आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळूनच हे काम केले जावे, असे पुढे आले आहे.

बिहारमधील एका खासदाराने म्हटले आहे की, लॉकडाऊन लागू झाल्यामुळे रोजंदारीवर काम करणारे अनेक कामगार, मजूर आपल्या गावी परत गेले आहेत. त्यांना आता परत आणणे आणि त्यांच्या मदतीने उत्पादन सुरू करणे अवघड होणार आहे.

 

News English Summary: Lock down was implemented on the night of the 24th of the previous month. Since then, only pharmaceutical companies have been allowed to continue their production in the country. But now the demand for starting some other important and perishable processing industries has begun. Demand for permission to start work of food processing industry, packaging-bottling, textile industry is coming up. Of course, this has been done by maintaining social distancing and maintaining the health of the employees.

News English Title: Story as center government considers Covid 19 lock down extension demand to resume industry Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x