3 May 2024 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

सरकारची नियमावली...हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन ५ वर्षांखालील मुलांना आणि या रुग्णांसाठी नाही

Covid19, Corona Crisis, Hydroxychloroquine

नवी दिल्ली, १० एप्रिल :  भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

मात्र अमेरिका व इतर देशांमध्ये मलेरियाच्या आजारावर वापरण्यात येणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधांची मागणी होत असताना फ्रान्समधील एका रुग्णालयाने या औषधाचा वापर थांबवला आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्समधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सेंटर ऑफ नाइसने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर कसा करायचा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नियमावली जारी केली आहे. यामध्ये कोणत्या रुग्णांना हे औषध देऊ नये, याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नेमलेल्या कृतीगटाने अभ्यास करून ही नियमावली तयार केली आहे. सध्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येत आहे. चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार हे औषध उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले होते. हे औषध १५ वर्षांखालील मुलांना देऊ नये, असे नव्या नियमावलीत म्हटले आहे. त्याचबरोबर रेटिनोपथी आणि हायपरसेन्सिटिव्हीटी असणाऱ्या रुग्णांनाही हे औषध देऊ नये, असे सूचविण्यात आले आहे.

 

News English Summary: Meanwhile, the Union Ministry of Health has issued a guideline on how to use hydroxychloroquine to treat coronary infected patients. It also provides information on which patients should not be given this medicine. The rule has been prepared by a study conducted by the Indian Council of Medical Research. Currently, the drug is being given hydroxychloroquine to cure coronary infected patients early. Research in China has shown that the drug is useful. The new rule states that the drug should not be given to children under 5 years of age. It is also advised not to give this medicine to patients with retinopathy and hypersensitivity.

News English Title: Story in advisory Indian government lists who should not use Hydroxychloroquine for Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x