6 May 2025 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

कधी कधी वाटत...!

Love Story Kadhi Kadhi Vatata, Piyush Khandekar

कधी कधी वाटत देवाने उगाचच मन दिले नको तितके हजारो आपल्या काहीही कामाचे नसलेले विचार मनात येत राहतात कधी जुन्या आठवणी मनात दाटून येतात तर त्याच त्याच रटाळ जगण्याची सवय ओठंना उगीचच हसायला लावतात…

मनाची एकग्रता करावी तरी कशी सालं! कळतच नाही आपल्याच तंद्रीत असलेले आपण पाठीमागून कधी कुणाची थाप पडते आणि एखाद श्वान गाडीखाली सापडल्यावर त्याची जशी केवीलवाणी अवस्था होते तशी कधी कधी आपलीही होते कुठे हरवत हे मन तिच्या विचारात…. ???

छे कहीतरीच काय ती कुठे तू कुठे काही ताळ मेळ तरी आहे काय?? तिचा अस विचार करण्या इतपत तू तिला ओळखतोस काय?? काय माहिती आहे तुला तिच्या बद्दल?? जे माहिती आहे ते खरच आहे कशावरून ती खोट बोलत असेल तर ?? तू तरी कुठे खर खर तुझ्या बद्दल सांगितले आहेस तुझे ही अफेअर होते ते…. मी सांगितले आहे तिला माझ्या बद्दल सगळे खरे खरे !! अगदी सुरुवाती पासून आता पर्यंत जे काही झाले ते सगळ सांगितलंय मी तिला….यात माझ मन थोड स्वार्थी झालंय मला मान्य आहे…

मी माझ मन माझ्या मनातली घुटमळ कुणाला तरी सांगायची होती अगदी एकटा किती रे सहन करणार किती काळ मनातच ठेवणार होतो मी ते सगळ असह्य झालंय अजिबात सहन नाही होत आता खूप झाल ज्याला पाहव तेव्हा तेव्हा माझ घर ठोठावणार नाही ठोठावणार सरळ आत येणार आणि काय सगळच लुटून जाणार ?? माझ जन्म काय देण्यासाठीच झालाय का मला नसेल का वाटत कुणाला दोन क्षण माझ मन काळाव मला समजून घ्याव !! मला नाही का हक्क माझ मन हलक करायचा माझ टेंशन कुणाला देयाचा ?? मी किती ऐकून घेणार किती समजावणार अजून किती त्यांच्या अडचणी माझ्या मनात कोंबणार ….?

त्यांनी याव भडाभडा मनातले सगळे गार्‍हाणे सांगावे आणि काय करू आता विचारावे ?? मी का सांगू तू अस कर—तस कर हे करून बघ सगळ ठीक होईल??

त्यांना आलेल्या अडचणी साठी माझ्याकडे उत्तरे आहेत पण माझ्या अडचणींना मी का म्हणून लपून ठेऊ का मी नको सांगू कुणाला?? का ?? का हे माझ्या सोबतच होत?

का??

 

लेखक: पियुष खांडेकर

Story English Title: Love Story Kadhi Kadhi Vatata written by Piyush Khandekar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या