7 May 2025 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मी आणि माझी कॉफी

Marathi Kavita, Marathi Laghu Katha, Marathi Stories, Marathi Bhay Katha

हे माझे ओठ आहेत ना…
ते एखादं सौंदर्य अथवा लावण्य पाहून शीळ घालतात…
डोळे प्रसन्न होऊन दिपुनही जातात…
पण… असलं काही दिसावं लागतं किंवा निदान
माझ्यासमोर तरी ते यावं लागतं… आणि मी ते बघावं लागतं…
जसं आता तुला या क्षणी, यावेळी मी बघतोय अगदी तसंच…
तेव्हा कुठे मग पुढचा प्रवास शीळ घालत सुरु होतो…
मग याला तू माझी रसिकता म्हण किंवा काहीही…
तुझ्यासारखी रंजकता सोबत असेल तर मग रगेल आणि रंगेल सगळंच होईल..!
#मीआणिमाझीकॉफी

 

लेखक: पियुष खांडेकर

Marathi Kavita English Title: Marathi Kavita Mi Ani Mazi Coffee written by Piyush Khandekar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या