6 May 2024 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

डेल्टा प्लसला संकट मानावं अशी आकडेवारी उपलब्ध नाही | कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशींचे मत

Dr Shashank Joshi

मुंबई, २४ जून | जगभर चिंतेचे कारण ठरलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे भारतात ४० हून अधिक रुग्ण आढळले असले तरी या प्रकारच्या कोरोना विषाणूविषयी चिंता करण्याइतपत पुरेसा डाटाच अजून उपलब्ध नसल्याचे महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे. तरीही काळजी घ्या, दुहेरी मास्क वापरा, गर्दी टाळा आणि लस घ्या, असे त्यांनी नमूद केले आहे.

विशेष म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात या विषाणूबाधेचे २१ रुग्ण आढळले असल्याचे सोमवारी स्पष्ट केले होते. यात रत्नागिरीत ९, जळगावमध्ये ७, मुंबईत २ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला असल्याचे म्हटले होते.

जळगावमध्ये दक्षता, आरोग्य यंत्रणा सतर्क:
डेल्टा प्लस विषाणूचा जिल्ह्यात ७ जणांमध्ये संसर्ग आढळून आल्यानंतर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांवर जळगाव जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या विषाणूपासून होणारा प्रसार अगदीच कमी असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात नव्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आणि ती राेज १०० च्या पुढे गेली तर पुन्हा विषाणूची ‘जीनम सिकव्हेन्सिंग’ करण्यात येईल.

राज्यातील रुग्णांचे विलगीकरण:
शरीरातील अँटिबॉडीजचा प्रभाव कमी करण्याची शक्ती या विषाणूत आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरू आहे. सुदैवाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. बरेचसे बरे होऊन घरी परतले आहेत. या व्हेरिएंटचा शास्त्रीय अभ्यास सुरू आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

डेल्टा विषाणूचा प्रादुर्भाव अजून मर्यादित, गंभीर इजाही नाही:
या डेल्टा विषाणूबाबत डॉ. शशांक जोशी यांनी दिव्य मराठीशी बाेलताना सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नमुने घेतले जात असताना नवीन स्ट्रेन आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव फार नाही. एक अपवाद वगळता राज्यात या विषाणूमुळे गंभीर इजा झाल्याचेही अद्याप समोर आलेले नाही. या सर्व रुग्णांचे नमुने घेतलेले असून पंधरा दिवसांनंतर त्याचा अहवाल मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: A member of covid task force Dr Shashank Joshi said there are no statistics on delta plus as a crisis news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x