14 May 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

राज्याची केंद्राकडे २००० सशस्त्र पोलिसांची मागणी

CRPF, Anil Deshmukh, Corona Crisis

मुंबई, १३ मे: राज्यात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. राज्यात पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत काही पोलीस कर्मचाऱ्यांचे करोना अहवाल पॉझिटिल्ह आल्याची माहिती समोर आली होती. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे. येत्या २५ मे रोजी रमझान ईदही असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) २० कंपन्यांची म्हणजेच २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

तत्पूर्वी आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने गृहखात्याला खोचक सल्ला दिला होता. कोरोना विषाणू पोलिसांच्या शरीरात घुसतोय व त्यांचा बळी घेतोय. हे देशभरातच सुरू आहे. दिल्ली पोलिसांनाही कोरोनाने ग्रासले आहे. दीडशेच्यावर दिल्ली पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत. याशिवाय निमलष्करी दलांतही कोरोना घुसला आहे. आतापर्यंत निमलष्करी दलांच्या हजारावर जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एएसबी दलांचे जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. ज्यांच्या भरवशावर आपण सगळे आहोत ते पोलीस दल कोरोना विषाणूच्या हल्ल्याने बेचैन झाले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांविषयी सहानुभूती, संवेदना वगैरे व्यक्त केली. राज्यातील पोलिसांना थोडी विश्रांती देऊन केंद्राकडून अधिकचे मनुष्यबळ महाराष्ट्रात मागवावे असे त्यांचे मत आहे व ते चुकीचे नाही, पण जे केंद्रीय सुरक्षा बल राज्याला हवे आहे त्यातही कोरोनाने घुसून सगळ्यांना हवालदिल करून सोडले आहे असं म्हटलं होतं.

महाराष्ट्रात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर सात पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली होती.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh has demanded 20 companies of the Central Armed Police Force (CAPF), i.e. 2,000 armed police, to maintain law and order as Ramadan falls on May 25.

News English Title: Home Minister Anil Deshmukh has demanded 20 companies of the Central Armed Police Force News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x