3 May 2025 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा - आ. आशिष शेलार

MP Sanjay Raut, Shivsena, MLA Ashish Shelar

मुंबई, १४ मे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राने मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असून देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? अशी विचारणा केली आहे. हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या! केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा ना! देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार?, सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल! तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?, हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला, असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

तसेच दुसरं ट्विट करताना आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, “देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल. तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या? हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!”.

मोदींनी या मजुरांबाबत संवेदना व्यक्त केल्या व आर्थिक पॅकेजमधून या मजुरांवर लक्ष केंद्रित केले जाईल असे सांगितले. या पार्श्वभूमीवर २० लाख कोटी सरकार कोठून जमा करणार? मुंबईत ‘मेट्रो’ रेल्वेसारखे प्रकल्प सुरू आहेत. लखनौ, हैदराबाद, दिल्लीतही ते अर्धवट अवस्थेत आहेत. पुन्हा बुलेट ट्रेनचे जपानी ओझे कर्जाचेच आहेत. हे प्रकल्प आता पुढे जाणे कठीण आहे. पुन्हा अधूनमधून निवडणुका येतील व त्यावर राजकीय पक्ष, खासकरून सत्ताधारी वारेमाप खर्च करतील. देशाबाहेर काळा पैसा आहे, तो आणावा व गरिबांना वाटावा अशी एक स्वप्न योजना मोदी यांनी मांडली होती त्यावर काम करण्याची संधी कोरोना संकटाने दिली आहे असं शिवसेनेनं सामनातून म्हटलं होतं.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has demanded that the Center should provide a separate financial package for Mumbai. Meanwhile, BJP leader Ashish Shelar has indirectly criticized Sanjay Raut over this and how will Mumbai be separated from it once the package for the country is announced? That is the question. This means that they have raised their tongues every morning and clapped their hands.

News English Title: BJP MLA Ashish Shelar on Shivsena MP Sanjay Raut over demanding special package for Mumbai News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या