28 April 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

पुणे: ससून इस्पितळात ५६ वर्षीय डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

doctor, covid 19, Sassoon Hospital in Pune

पुणे, २३ मे : मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय झाला आहे. मात्र त्यात अजून काही चिंता वाढविणाऱ्या गोष्टी घडत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले पुण्यातील ५६ वर्षीय डॉक्टरांचा पुण्यातील ससून इस्पितळात कोरोनामुळे अखेर मृत्यू झाला आहे. कोरोना योद्धेच यामध्ये जीव गमावत असल्याने पुण्यातील प्रशासनाची झोप उडाली आहे.

सध्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.

राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

News English Summary: A 56-year-old doctor from Pune, who received a positive corona report a few days ago, has finally died due to corona at Sassoon Hospital in Pune.

News English Title: A 56 year-old doctor who had tested positive for covid 19 passed away at Sassoon General Hospital in Pune News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x