28 April 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस भरवलं, ३ दिवस तडफडून प्राण सोडले

Pregnant elephant, fed Pineapple stuffed with crackers, Keralas Malappuram

तीरुवनंतपुरम, ३ जून : केरळमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली. इथे एका गर्भवती हत्तीणीला काही समाजकंटकांनी फटाके भरलेलं अननस खाऊ घातलं. त्या हत्तीणीच्या तोंडात अननसमधील फटाके फुटले आणि तिच्या गर्भात असलेल्या पिल्लाचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी या हत्तीणीनेही प्राण सोडले. ही हत्तीणी १४ ते १५ वर्षांची असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ही घटना मलप्पुरम जिल्ह्यात घडली. या ठिकाणी ही हत्तीणी अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर आली आणि ती गावात भरकटली. या गावातील काही स्थानिकांनी तिला अननसमध्ये फटाके भरुन खाऊ घातलं. हत्तीणीला भूक लागलेली असल्याने तिने तो अननस खाल्ला आणि काहीच क्षणात तिच्या पोटात फटाके फुटू लागले.

निलंबूर येथील वन्य अधिकारी मोहन कृष्णन यांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. हत्तींना पळवण्यासाठी फटाक्यांचा वापर, ही काही नवीन गोष्ट नाही. पण या घटनेनं पुन्हा एकदा आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे का? याचा विचार नक्की करण्यास भाग पाडले आहे.

मोहन कृष्णन यांनी लिहिले की,”अन्नाच्या शोधात ती गावापाशी आली. मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा अनुभव येईल असे तिला वाटलेही नव्हते. गर्भवती असल्याने मनुष्य दया दाखवतील असे तिला वाटले. त्यामुळे तिनं त्या लोकांवर आंधळा विश्वास दाखवला आणि ते अननस खाल्ले. तिच्या डोक्यात फक्त पोटातील बाळाचा विचार होता. पण जे घडलं ते दुर्दैवी होतं.

तोंडाला झालेल्या दुखापतीमुळे ती इकडेतिकडे भटकत होती आणि तिला काही खाताही येत नव्हते. पण, तरीही तिनं गावातील एकाही व्यक्तीला त्रास दिला नाही किंवा हल्ला केला नाही. प्रचंड वेदनेसह ती नदीत उभी राहिली. २७ मे रोजी ही घटना घडली. तिला नदीतून बाहेर खेचण्यासाठी दोन हत्तींची मदत घेण्यात आली.

 

News English Summary: An elephant that was pregnant died in Kerala, standing in water, last Wednesday, after she ate a pineapple filled with firecrackers, allegedly left by some locals. The fruit exploded in her mouth, leading to the inevitable tragedy. The incident came to light after a forest officer narrated the details of the horrific death on social media.

News English Title: Pregnant elephant fed Pineapple stuffed with crackers in Keralas Malappuram she died standing in river News latest Updates.

हॅशटॅग्स

#Kerala(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x