29 April 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

कोकणात चक्रीवादळाने आंबा, फणस, सुपारीच्या झाडांचं प्रचंड नुकसान

Nature Cyclone, Konkan, Raigad, Ratnagiri, Sindhudurga

रत्नागिरी, ४ जून : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता आपण भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या पॅकेजची मागणी करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. या वादळाचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत, असे अदिती तटकरे यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात दिसू लागला आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. दक्षिण रत्नागिरीतील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे. वेगवान वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची घरांची छते उडून गेली. नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव काल संध्याकाळपर्यंत होता. चक्रीवादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना मोठा फटका बसला. वेगवान वाऱ्यामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्रे कागदासारखी उडून जमिनीवर कोसळत होती.

जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करायला सुरुवात केली आहे. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठं नुकसान झालं आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावात सुमारे ८० घरांचं या वादळात नुकसान झालं आहे. जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदाराचे मोठं नुकसान झालं आहे. सुमारे ५०० पोफळी, २० आंबा कलमे, सहा फणस झाडे पडली आहेत. वाऱ्यामुळे झाडावरील आंबा जमिनीवर पडून नुकसान झालं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून नुकसानीचा आढावा, मदतीच्या बाबतीत कोकण नेहमीच इतर विभागांच्या तुलनेत उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, पॅकेज कोल्हापूरग्रस्तांप्रमाणे व्यक्तिगत पातळीवर असावा, सरकार उपाययोजना करत आहे, मात्र दुर्दैवानं उपायोजना कमी, मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव, दरेकरांचा आरोप, प्रवीण दरेकर नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या मुख्यमंत्री आणि राज्यपाला भेटून निवेदन देणार असल्याचं सांगितलं आहे.

 

News English Summary: Raigad district has been hit hard by the cyclone. Houses have been badly damaged. Against the backdrop of the damage in the district, the Guardian Minister Aditi Tatkare has reviewed the damage caused by the cyclone. He has since demanded a special financial package. We have made it clear that we will demand this package from Chief Minister Uddhav Thackeray as compensation for the damage caused in Raigad district.

News English Title: Konkan region has been hit hard by the cyclone News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x