2 May 2025 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

पुणे: परिस्थितीला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Pune, Family suicide

पुणे, १९ जून : एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने पुणे जिल्हा हादरला आहे. आपल्या दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर दाम्पत्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सुखसागर नगर परिसरात घडली आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्याने तसेच फोनही न उचलल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौघांनी पंख्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटना काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

या दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी घराच्या भिंतीवर कारण लिहून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवित आहोत’ असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले. त्याखाली पती पत्नीची सही आढळून आली आहे.यातील पतीचा डिजिटल आय कार्ड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे समजते.

 

News English Summary: Pune district is shaken by the suicide of four members of the same family. A shocking incident has taken place in Sukhsagar Nagar area where a couple ended their life after strangling their two children.

News English Title: Pune district is shaken by the suicide of four members of the same family at Sukhsagar Nagar area News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या