4 May 2024 10:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

त्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह - फडणवीस

Devendra Fadnavis, Ajit Pawar

मुंबई, २३ जून : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.

गेल्यावर्षी राजभवनावर भल्या पहाटे पार पडलेल्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह होते, असा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या शपथविधीविषयी भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र, आम्ही अर्ध्या रात्री फोन करायची वेळ आली की आम्हाला अमित शहाच आठवतात. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत शपथ घेण्यापूर्वी आम्ही अमित शाह यांना मध्यरात्री फोन करुन सर्व कल्पना दिली होती. यानंतर त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी घडल्या. त्यामुळे या शपथविधीचे खरे शिल्पकार अमित शाह हेच होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

News English Summary: We remember Amit Shah when it was time to call in the middle of the night. Before swearing in with Ajit Pawar after last year’s assembly elections, we phoned Amit Shah at midnight and gave him all the ideas. The next thing that happened was what they told us. Therefore, the real sculptor of this swearing-in ceremony was Amit Shah, said Fadnavis.

News English Title: Union Home Minister Amit Shah operates all things of oath taking ceremony with Ajit Pawar says Devendra Fadnavis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x