गृहमंत्र्यांनी केलेल्या १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून रद्द

मुंबई, ५ जुलै : काल चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.
दरम्यान, यावरून शिवसेनेच्या गोटात संताप व्यक्त करण्यात आला मात्र त्याची खुलेआम प्रतिक्रिया महाविकास आघाडी असल्याने टाळल्याचं पाहायला मिळालं. मात्र राष्ट्रवादीच्या गोटात आनंद पाहायला मिळाला, दरम्यान यावर राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे म्हणाले की युती काळात देखील सत्तेत एकत्र असताना शिवसेना आणि भाजपचे नेते तसेच पदाधिकारी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करतंच होते. एकप्रकारे असे प्रकार भविष्यात देखील होण्याची शक्यता या विधानावरून दिसत असल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यानंतर शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रशासकीय दणके मिळण्यास सुरुवात झाली आहे.
२ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. मात्र ४ दिवसातच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रद्द केल्या आहेत. यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता.
बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. बदल्या रद्द करताना या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी रद्द केले.
दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वादावर खुलासा केला आहे. ‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ज्या अंतर्गत बदल्या केल्या, त्या माझ्या कार्यालयाने आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने रद्द केल्या आहेत. आमच्या सरकारमध्ये चांगला समन्वय आहे आणि कोणताही मतभेद नाही,’ असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
The internal transfers in Mumbai made by @CPMumbaiPolice have been put on hold by CM @OfficeofUT and my office. pic.twitter.com/aG1dxzPJTv
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 5, 2020
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या या खुलाशानंतर तर आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. गृहमंत्री जर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या बदल्या केल्याचं म्हणत असतील तर पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना न विचारताच या बदल्या केल्या का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्याला गृहमंत्र्यांची परवानगी लागते. पोलिसांच्या बदल्यांचे आदेशाचं परिपत्रक बघितलं तर ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने नाही, तर गृहविभागाने म्हणजेच अनिल देशमुखांच्या खात्याने काढलं आहे.
News English Summary: In July, Home Minister Anil Deshmukh transferred 10 Deputy Commissioners of Police in Mumbai. However, within 4 days, the Chief Minister has canceled these transfers. This has once again exposed the differences and lack of coordination within the government.
News English Title: Chief Minister Uddhav Thackeray cancels transfer of police done by home minister Anil Deshmukh News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER