3 May 2024 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

चीननं आपल्या हद्दीत प्रवेश केला नव्हता या विधानावरून देशाची माफी मागावी

Congress spokesperson Pawan Kheda, PM Narendra Modi, Apologize, China territory

नवी दिल्ली, ७ जुलै : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.

तर, दुसरीकडे चीन सरकारच्या मालकीचे ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीनचे सैन्यांनी फ्रंट बॉर्डरहून सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये ३० जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे सैन्य माघारी घेण्यात आले आहेत. कमांडर पातळीवरील बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे. भारताने चीनसोबत शांतेचे धोरण ठेवले पाहिजे आणि आपले सैन्य कमी करायला हवे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भारताच्या हद्दीत कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं. त्यानंतर मोठी चर्चा देखील होती आणि त्यात जर भारताच्या हद्दीत घुसखोरी झालीच नव्हती मग आपले जवान शहीद झालेच कसे हा देखील प्रश्न उपस्थित झालं होता. मात्र आता चिनी सैन्याने मागे हटण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आल्याने पुन्हा तोच गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जर भारताच्या हद्दीत चिनी सैन्याची घुसखोरी झालीच नव्हती मग चिनी सैन्य स्वतःच्याच भूभागातून मागे फिरत आहे असं म्हणायचं आहे का असा उलट प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे

दरम्यान यावरून कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सोमवारी पंतप्रधानांना माफी मागण्यास सांगितले. खेडा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जुन्या विधानाबद्दल माफी मागावी, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, चीननं आमच्या हद्दीत प्रवेश केलेला नाही.

विशेष म्हणजे चीनने अधिकृत वक्तव्य केले असून, कबुलीजबाब देऊन भारताशी वाढता तणाव कमी करण्यासाठी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलिंग पॉइंट 14वर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने उभे होते, तेथून दोन्ही देशांचे सैनिक काही किलोमीटर मागे सरकले आहेत. आता कॉंग्रेसने या प्रकरणावरून पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनी आधीच्या वक्तव्यावर माफी मागावी आणि पंतप्रधान किंवा स्वत: संरक्षण मंत्र्यांनी देशातील जनतेसमोर यावे आणि लडाखमधील सध्या काय परिस्थिती आहे हे स्पष्ट करावे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा येथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी या संधीचा फायदा घ्यावा. राष्ट्राला संबोधित केले पाहिजे, देशाला विश्वासात घेतले पाहिजे, देशाची माफी मागायला हवी. होय मी चूक केली, असं मान्य करायला हवं. मी तुमची दिशाभूल केली किंवा ते माझे शब्दात चुकीचे होते, असं मोदींनी सांगितलं पाहिजे.

 

News English Summary: Congress spokesperson Pawan Kheda on Monday asked the Prime Minister to apologize. Kheda said that Prime Minister Modi should apologize for his old statement in which he said that China had not entered our territory.

News English Title: Congress spokesperson Pawan Kheda on Monday asked the Prime Minister to apologize over China had not entered our territory News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x