8 May 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

राजस्थान सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५ कोटीची ऑफर, भाजप नेत्यांना अटक

BJP Satish Poonia, Rajednra Rathore, MLA toppling, Rajasthan Govt, CM Ashok Gehlot

जयपूर, ११ जुलै : मध्य प्रदेशात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी ठरल्यानंतर आता राजस्थानमध्येही तशाचप्रकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाकडून सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांच्यावर विशेष जबाबादारी सोपविण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.

राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. भरत मालानी आणि अशोक सिंह अशी या नेत्यांची नावे आहेत. त्याना ब्यावर उदयपूरच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे. मालानी यांच्या कॉल रेकॉर्डिंगवरून आमदारांचा घोडेबाजार केला जात असल्याचे समजले, असे या पथकाने म्हटले आहे.

सध्या या दोन्ही नेत्यांची जयपूरमध्ये चौकशी सुरु आहे. भरत मालानी यांनी राजस्थान भाजपामध्ये मोठमोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. राजस्थान सरकार पाडण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली एसओजीने गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार काही फोन रेकॉर्डिंग वरून अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी कट रचला जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद सुरु आहेत, असे पसरविले जात आहे. यामुळे काही जण अपक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांना फोडून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत शनिवारी पत्रकारपरिषदेत म्हटले की, सध्या आपल्याला कोरोनाविरुद्धच्या लढाईवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र, भाजप सध्या राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपचे सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड हे केंद्रीय नेतृत्त्वाच्या सांगण्यावरून वेगवेगळे डाव टाकत आहेत. त्यांच्याकडून अनेक आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे. सुरुवातीला १० कोटी आणि सरकार पडल्यानंतर १५ कोटी रुपये दिले जातील, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.

भाजप देशाला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करत होता. मात्र, आता भाजपलाच काँग्रेसची भीती वाटू लागली आहे. राजस्थानमधील सरकार स्थिर असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सध्या आम्ही पुढील निवडणूक जिंकण्याची तयारी करत आहोत, असे गेहलोत यांनी म्हटले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजप पक्ष असा नव्हता. २०१४ नंतर भाजपकडून अस्मिता आणि धर्माच्या आधारावर फुट पाडण्याचे राजकारण सुरु झाल्याचा आरोपही यावेळी गेहलोत यांनी केला.

 

News English Summary: “Right now we have to focus on the fight against Corona,” Chief Minister Ashok Gehlot told a news conference on Saturday. However, the BJP is currently trying to destabilize the government in Rajasthan. BJP’s Satish Punia and Rajendra Rathore are making different moves at the behest of the central leadership.

News English Title: BJP Satish Poonia and Rajednra Rathore offering 25 Cr to MLA for toppling Rajasthan state government says CM Ashok Gehlot News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AshokGehlot(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x