3 May 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

सगळी सूत्रे भाजपच्या हाती, सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही - अशोक गेहलोत

Sachin Pilot, CM Ashok Gehlot, BJP

जयपूर, १४ जुलै : राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सचिन पायलट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नाही’, असे ट्विट त्यांनी केले आहे. अर्थात ‘सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र त्याचा पराभव करता येत नाही’, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ते नेमकं काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. कारण, त्यांची सगळी सूत्रे भाजपच हलवत आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. काँग्रेसने मंगळवारी सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. यानंतर अशोक गेहलोत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या सहा महिन्यांपासून सचिन पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वर्तन ‘आ बैल मुझे मार’ असेच होते. गेल्या काही काळातील त्यांची ट्विटस आणि वक्तव्ये बघता त्याचा प्रत्यय येईल.

मी नेहमी सर्व आमदारांना एकसारखी वागणूक दिली. आज आमच्या तीन सहकाऱ्यांवर कारवाई करताना आमच्यापैकी कोणालाही आनंद वाटत नाही. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी अगोदरच भाजपच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, त्यांच्यात सौदेबाजी झाली होती. त्यामुळे आमचा नाईलाज झाला, असे अशोक गेहलोत यांनी सांगितले.या सगळ्यासाठी भाजप रिसॉर्टपासून अगदी सर्वकाही उपलब्ध करुन देत आहे. मध्य प्रदेशात यासाठी ज्या टीमने काम केले होते तीच टीम आता राजस्थानमध्ये कार्यरत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला.

दरम्यान, सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच भाजपने बैठक बोलावली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होत असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया, राष्ट्रीय संघटन मंत्री वी.सतीश, गुलाबचंद कटारिया, उपनेता प्रतिपक्ष राजेंद्र आणि प्रदेश संघटन महामंत्री चंद्रशेखर हजर आहे. या बैठकीमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागण्यावर चर्चा होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर हे दिल्लीवरुन जयपूरला रवाना झाले आहे.

 

News English Summary: Sachin Pilot has nothing in his hands. Because, all their slogans are being moved by BJP, alleged Rajasthan Chief Minister Ashok Gehlot. Congress on Tuesday sacked Sachin Pilot from the post of Deputy Chief Minister and State President. After this, Ashok Gehlot was talking to the media.

News English Title: There is nothing in Sachin Pilot hands it is the BJP which is running the show News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x