3 May 2025 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोकण गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन कालावधी १० दिवसांवर

Coronavirus Anil Parab, Konkan ST e pass, home quarantine, Ganeshotsav

मुंबई, ४ ऑगस्ट: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यां चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन होण्याचा कालावधी १४ वरुन १० दिवसांवर आणण्यात आला आहे. सोबतच एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे.

खासगी वाहनांनी कोकणात जाणाऱ्यांना ई-पास काढावा लागेल. एसटीनं जाणाऱ्यांना ई-पासची गरज भासणार नाही. एसटी हाच त्या प्रवाशांसाठी ई-पास असेल अशी माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. २२ जणांनी मिळून एसटीचं ग्रुप बुकिंग केल्यास प्रवाशांना एसटी थेट त्यांच्या गावात सोडेल. त्यांना जेवण एसटीमध्येच करावं लागेल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.

प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच एका एसटी बसमधून २२ जणच प्रवास करू शकतात. खासगी बसेससाठीदेखील सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू आहे. त्यामुळे अनेक खासगी बस वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दरानं तिकीट विक्री करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासगी बसेस एसटीपेक्षा दीडपटच अधिक भाडं आकारू शकतात, अशी सूचना सरकारनं केली आहे. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित बस वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येईल.

 

News English Summary: Home quarantine period for employees going to Konkan during Ganeshotsav has been reduced from 14 to 10 days. Also, e-pass will not be required while traveling by ST. However, e-pass will be mandatory when traveling by private vehicle.

News English Title: Coronavirus Anil Parab on Konkan ST e pass home quarantine Ganeshotsav News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या