21 May 2024 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन

Covid 19, Dr Dilip More, passed away, Ratnagiri

रत्नागिरी, ६ ऑगस्ट: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांना आतापर्यंत ४२ चिमुकल्यांना कोरोनामुक्त केले आहे. त्यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.

डॉक्टर मोरे यांनी आपली सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्यांना कोरोना झाला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. मोरे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून दाखल झाले होते. वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत जिल्हा रुग्णालयात त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. कुवारबाव येथे स्वतःच्या घरीही ते रुग्णांना सेवा देत असत. निवृत्तीनंतर लांजा येथे काही काळ त्यांनी दवाखाना सुरू केला होता. नंतर ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून रुजू झाले. त्यानंतर सुमारे सहा वर्षे ते तेथे कार्यरत होते.

गेल्या मार्च महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात सहा महिन्यांच्या एका बालकाला काेरोनाची बाधा झाली. त्याची आई काेरोनामुक्त होती. पण तिच्या बालकाला कोरोना झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानाचे होते. ते आव्हान डॉ. मोरे यांनी लिलया पेलले. मातेच्या दुधावरच त्या बालकाला बरे करण्यात त्यांनी यश मिळवले. त्यानंतर तीन महिन्यांत सुमारे ४२ बालकांना त्यांनी कोरोनामुक्त केले.

 

News English Summary: Dilip More, a pediatrician at Ratnagiri District Government Hospital, died due to corona. He died during treatment. He was 65 years old. So far, 42 Chimukals have been coronated. He had contracted corona a few days ago.

News English Title: Covid 19 । Dr Dilip More passed away at Ratnagiri News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x