6 May 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

आ. रवींद्र वायकर यांना सरकारमध्ये पुन्हा महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

Chief Minister Uddhav Thackeray, Former minister Ravindra Waikar, Shivsena

मुंबई, १० ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या अगदी जवळचे मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना सीएमओ कार्यालयात समन्वयकाचे पद देण्यात आले होते. तर महाविकास आघाडी सरकारसाठी आपल्या मंत्रीपदाची आहुती देणारे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांना केंद्रातील समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी शासकीय लाभ, भत्ते देण्यात येत असल्याचा शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र विरोधकांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उकरून काढला.

शिवसेनेतील आमदारांची कामे होत नसल्याची तक्रार वारंवार केली जात असल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांनी रवींद्र वायकर यांच्याकडे समन्वयाची भूमिका देणार असल्याचे सुतोवाच केले.

याआधी देखील वायकर यांना मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयकाची जबाबदारी देऊन त्यांना शासकीय सुविधा दिल्या होत्या. मात्र ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा काढून भाजपने टीका केल्यानंतर त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती.

 

News English Summary: MLA Ravindra Vaikar, who is considered close to Chief Minister Uddhav Thackeray and Matoshri, was upset that he did not get a ministerial post in the Mahavikas Aghadi government. Therefore, on February 11, 2020, he was given the post of coordinator in the CMO office.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray may give important responsibility to former minister Ravindra Waikar again News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x