2 May 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

पारदर्शक करप्रणाली सुरु | पण फेसलेस कर प्रणाली म्हणजे काय - सविस्तर

faceless income tax policy, inaugurated by PM Narendra Modi

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट : प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी ‘पारदर्शक कर – सन्माननीय’ करप्रणाली सुरु केली आहे. या नव्या प्रणालीमुळे देशातील करदात्यांना अनेक सुविधा पुरविल्या जातील. त्यांना प्राप्तीकरापासून मुक्तता मिळेल आणि अनावश्यक कटकटीपासून मुक्तता होईल. ही करप्रणाली लॉन्च करताना पंतप्रधान मोदी यांनी एकीकडे प्रामाणिक करदात्यांचे कौतुक केले तर दुसरीकडे कर न भरणाऱ्यांना सल्ला दिला. ही नवी करप्रणाली आजपासून लागू होणार असल्याचे मोदींनी सांगितलं आहे. पण यामध्ये अनेकांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे फेसलेस म्हणजे नेमकं काय.

फेसलेस म्हणजे काय?
पंतप्रधानांनी ही योजना जाहीर करताना सांगितले की, नवीन सिस्टीमद्वारे ट्रान्सफर पोस्टिंगसाठी होणारे जुगाड, शिफारशी संपणार असून आयकर विभागाचा धाक जमविण्य़ाचे प्रयत्नही संपणार आहेत. हा प्रकार शून्यावर येणार आहे. आयकर विभागाला याचा फायदा होणार असून अनावश्यक खटले थांबणार आहेत. तसेच बदली, पोस्टिंगसाठी लावली जाणारी शक्तीही कमी होणार आहे. आयकर विभागाला आता करदात्यांच्या इज्जतीचा संवेदनशीलतेने काळजी घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही प्रकारची शंका असेल तर करदात्यांना अपील आणि चौकशीचा अधिकार देण्यात आला आहे. आजच्या या पावलामुळे विना कटकट, विना त्रासदायक आणि फेसलेस कर प्रणालीकडे भारताने झेप घेतली असल्याचे मोदी म्हणाले.

 

News English Summary: While launching the tax system, Prime Minister Modi praised honest taxpayers on the one hand and advised non-payers on the other. Modi has said that this new tax system will be implemented from today. But many have questioned what Faceless is.

News English Title: What is faceless income tax policy inaugurated by PM Narendra Modi News latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x