4 May 2025 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

मंत्रिमंडळात अनेक युवा नेते | पण सेनेचे मंत्रीच आदित्य ठाकरेंचं नाव घेत आहेत - आ. नितेश राणे

Sushant Singh Death Case, BJP MLA Nitesh Rane, Rhea Chakraborty, Aaditya Thackeray

मुंबई, २१ ऑगस्ट: पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

“अनिल परब यांनीच ट्विट करत १३ तारखेला पार्टी झाली असं सांगितलं. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत,” असा दावा नितेश राणे यांनी केला.

तसंच काँग्रेसप्रमाणे शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. “शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं पाहिजे,” अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईला पोहोचली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं पाच टीम तयार केल्या आहेत. त्यातील एक टीम वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. सीबीआयचे अधिकारी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याकडून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं घेणार आहेत. त्यानंतर सीबीआय त्यांच्या पद्धतीनं तपास सुरू करेल.

मुंबईत दाखल झालेले सीबीआयचे अधिकारी सध्या गेस्ट हाऊसवर आहेत. या गेस्ट हाऊसवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंध असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला आणण्यात आलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण याची माहिती उपलब्ध झालेली नाही. सीबीआयनं सुशांतचा कूक नीरजशीदेखील संपर्क साधला आहे. त्याचा जबाबदेखील नोंदवला जाणार आहे.

 

News English Summary: From day one, we did not name any young leaders. BJP leaders have also called him a youth minister. There are many young ministers in the cabinet. Now it is surprising that Aaditya Thackeray is the only one who thinks that he is a cabinet minister, ”said Nitesh Rane.

News English Title: Sushant Singh Death Case BJP MLA Nitesh Rane On Rhea Chakraborty Aditya Thackeray News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या