27 April 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

राजा समाजाचा नव्हे तर रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार? - वडेट्टीवार

Minister Vijay Wadettiwar, Chhatrapati Sambhaji Raje, Maratha Reservation

मुंबई, ९ ऑक्टोबर : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. MPSC परीक्षा तात्काळ रद्द करावी, असी मागणी मराठा संघटनाकडूव करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात येत आहे. या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. खासदार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता संभाजीराजे छत्रपतींना विचारला आहे. शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले; मग हे राजकारण कशासाठी, असा प्रश्न यावेळी विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जोपर्य़ंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत पोलीस भरती रद्द करावी आणि एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मराठा समाजाकडून मागणी होत आहे. दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यात यावी, असे आवाहन केले आहे. आम्ही अभ्यास केला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमचे वर्ष वाया जाईल, असे सांगत परीक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

News English Summary: The king belongs to the peoples, not to the particular cummunity, Minister for Relief and Rehabilitation Vijay Vadettiwar has asked MP Sambhaji Raje Chhatrapati a direct question against whom the sword will be raised. Shahu Maharaj presented progressive ideas. Vijay Vadettivar raised the question of why this politics. Fighting for one community should not harm the other.

News English Title: Minister Vijay Wadettiwar Reaction after Chhatrapati Sambhaji Raje Statement On Maratha Reservation Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x