29 April 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश रमन्ना यांच्यावर मुख्यमंत्री रेड्डींचे गंभीर आरोप

Chief Minister Y S Jaganmohan Reddy, serious allegations, Supreme court senior judge Ramanna

हैदराबाद, ११ ऑक्टोबर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश एन वी रमन्ना यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन यांनी सरन्यायाधीशांना या संदर्भात आठ पानांचे पत्र पाठवले आहे. जगनमोहन रेड्डी यांनी आरोप केला आहे की, न्यायाधीश रमना टीडीपी अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्तीय आहेत व त्यांच्याच इशाऱ्यावरून वायएसआर काँग्रेसचे सरकार पाडू इच्छित आहेत.

याचबरोबर या पत्राममध्ये न्यायाधीश रमन्ना व चंद्रबाबू नायडू यांच्यातील घनिष्ठ संबंधाबाबत विस्तृतपणे रेड्डी यांनी सांगितले आहे. नायडू यांच्या सरकारच्या काळात विशिष्ट प्रकरणामधील उच्च न्यायालयाचे विशेष निर्णय आणि न्यायधीशांची नावं यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात देखील रेड्डी यांनी सांगितले आहे.

सरन्यायाधीश बोबडे यांच्या नंतर एन वी रमन्ना हेच सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांचे वरिष्ठ न्यायाधीस आहेत. हे पहिल्यांद होत आहे जेव्हा जगनमोहन सरकारने न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला चढवला आहे. या अगोदर त्यांच्या पक्षाचे नेते व मंत्र्यांनी विविध मुद्यांवरून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधत वक्तव्यं केलेली आहेत.एखादाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशावर अशाप्रकारे पक्षपातीपणाचा आरोप केल्या जाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर येत आहे.

 

News English Summary: The Andhra Pradesh government on Saturday accused Supreme Court judge N V Ramana and the state high court of attempting to destabilize and topple the YSR Congress government in the state led by chief minister Y S Jaganmohan Reddy under the directions of Telugu Desam Party president N Chandrababu Naidu. The allegations, which could not be verified by Hindustan Times, were made in a press conference in Hyderabad late on Saturday evening. The state government also issued a statement to this effect. A letter written by Reddy to Chief Justice of India SA Bobde,

News English Title: Chief Minister Y S Jaganmohan Reddy serious allegations against Supreme court senior judge Ramanna Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Y S Jaganmohan Reddy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x