14 December 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

आजचे राशिभविष्य | शनिवार | ०७ नोव्हेंबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी भविष्य (Aries Today’s Horoscope) : तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Today’s Horoscope) : तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Today’s Horoscope) : आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Today’s Horoscope) : या दिवशी तुम्हाला यश मिळेल. नेतृत्वगुण चांगले असल्याने त्याचा फायदा होईल. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असेल. जुनी देणी वसूल होतील. चांगले कार्य हातून घडेल.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Today’s Horoscope) : मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Today’s Horoscope) : मित्र तसेच नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वेळेचा सदुपयोग कराल. चिंता वाढू शकते. जोखीम उचलण्याची तयारी दाखवाल. धन प्राप्ती होऊ शकते.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Today’s Horoscope) : आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Today’s Horoscope) : शारिरीक कष्टामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल. मोठा खर्च होऊ शकतो. आर्थिक स्थिती बिघडू शकते. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतात.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Today’s Horoscope) : जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Today’s Horoscope) : अनेक दिवसांपासून प्रलंबित काम पूर्ण होईल. कामात प्रगती होईल. गरीबांना अन्न दान करा.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Today’s Horoscope) : भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Today’s Horoscope) : दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. नवी कामे मिळतील. व्यवसायात वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील. नोकरीमध्ये प्रभाव पडेल.

Article English Summary: दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राश‍ी भविष्य, वृषभ राश‍ी भविष्य, मिथुन राश‍ी भविष्य, कर्क राश‍ी भविष्य, मकर राश‍ी भविष्य, सिंह राश‍ी भविष्य, कन्या राश‍ी भविष्य, तूळ राश‍ी भविष्य, वृश्चिक राश‍ी भविष्य, धनु राश‍ी भविष्य, कुंभ राश‍ी भविष्य, मीन राश‍ी भविष्य यांचा समावेश आहे.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 07 November 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x