3 May 2025 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

भाजपचं नुकसान होईल असं नाथाभाऊ वागणार नाहीत | चंद्रकांत पाटील आशावादी

Eknath Khadse, Rremain in BJP, Chandrakant Patil

मुंबई, २० ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे असे बोलले जात आहे. २२ ऑक्टोबरला ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाही, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची मनधरणी सुरु आहे,” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचं नुकसान होईल असं ते वागणार नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पुन्हा सक्रिय होतील. त्यामुळे इतरांचा हिरमोड होईल,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल खडसेंबद्दल बोलताना त्यांच्या क्षमतेचं कौतुक केलं होतं. खडसे यांचं कर्तृत्व आणि खानदेशात त्यांचं असलेलं स्थान दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांच्या कामाची नोंद घेतली जात नसल्याची त्यांची भावना आहे. ही नोंद घेतली जाईल त्या पक्षात जाण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यांना एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो,’ असं पवार यांनी म्हटलं होतं. पवारांच्या या सूचक वक्तव्यानंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकताच बाकी असल्याचं बोललं जात आहे.

 

News English Summary: BJP state president Chandrakant Patil has responded. Nathabhau will not go anywhere, he is a senior BJP leader. BJP state president Chandrakant Patil has said that their mindset is on. Nathabhau will not go anywhere, he is a senior BJP leader. They will not act in a way that will harm the party. Efforts are being made to allay their grievances.

News English Title: Eknath Khadse will remain in BJP says BJP state President Chandrakant Patil News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या