28 April 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

अब्जाधीश बिर्ला कुटुंबियांसोबत अमेरिकेत वर्णभेद | रेस्टॉरंटमधून बाहेर काढले

Ananya Birla, alleges racism, Staff at restaurant, America

वॉशिंग्टन, २६ ऑक्टोबर : देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबियांसोबत वंशभेद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बिर्ला कुटुंबियांसोबत ही घटना अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये घडली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला यांनी ट्वीट करून याची माहिती दिली.

अनन्या बिर्लाने ट्वीटमध्ये लिहिले की या रेस्टॉरट स्कोपा इटालियन रूट्सने मला आणि माझ्या कुटुंबियांना आपल्या परिसरातून बाहेर काढले. हा वर्णभेद खरच दु:खी करणारा आहे. तुमच्या तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे. हे योग्य नाही. आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्य अनन्याने लिहिले की आम्ही रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी तीन तास वाट पाहिली. शेफ अँटोनियो तुमचे वेटर जोशुआ सिल्वरमॅन यांची माझ्या आईसोबत वागणूक खूपच कठोर होती. याला वर्णभेद म्हटले जाऊ शकते. हे योग्य नव्हे.

कुमार मंगलम बिर्ला यांची पत्नी आणि अनन्या बिर्लाची आई नीरजा बिर्लानेही ट्वीट करत ही घटना खूपच हैराणजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले की रेस्टॉरंटला कोणत्याही ग्राहकाला अशी वागणूक देण्याचा कोणताही अधिकार नाही.

नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटर आर्यमान बिर्लानेही या प्रकरणी ट्वीट करत अत्यंत खराब अनुभव असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर युजर्स अनन्या बिर्लाच्या या ट्विटवर चांगल्याच प्रतिक्रिया देत आहेत. अनेक सेलिब्रेटीजनीही अनन्या बिर्लाच्या या ट्वीट्लवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता करणवीर वोहराने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की ‘अनन्या बिर्ला हे खूपच वाईट आहे की तुला आणि तुझ्या कुटुंबियांना या स्थितीतून जावे लागले. ही रेस्टॉरंटसाठी शरमेची बाब आहे.’ तर अभिनेता रणविजय सिंहनेही यावर प्रतिक्रिया देताना लिहिले की ‘यावर विश्वास बस नाहीये. हे योग्य नाही. ‘

 

News English Summary: Ananya Birla, the daughter of Aditya Birla Group’s billionaire chairman Kumar Mangalam Birla, has slammed a US restaurant for being “racist”, saying the Italian-American dining place in California “literally threw” her and her family out of their premises. The singer and artist took to Twitter to share her ordeal on Saturday, saying “this is not okay”. “This restaurant @ScopaRestaurant literally threw my family and I, out of their premises. So racist. So sad. You really need to treat your customers right. Very racist. This is not okay,” she said in a tweet.

News English Title: Ananya Birla alleges racism by staff at restaurant in America News Updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x