3 May 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जावू देवू नका | ते निघाले तर 'मृता' उरेल - शिवसेना

Shivsena leader Neelam Gorhe, Amrtuta Fadnavis, Shivsena party

मुंबई, १३ नोव्हेंबर: अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले होते. या ट्वीटमध्ये अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्यानेच वादाची ठिणगी पडली आहे. अमृता यांच्या या टीकेला शिवसेनेकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले असून यंदा दिवाळीत फटाके फोडायचे नसले तरी ऐन दिवाळीत शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची फटकेबाजी मात्र रंगणार असेच यावरून दिसत आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत रश्मी ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावे जमीन व्यवहार झाल्याची कागदपत्रं समाज माध्यमांवर शेअर केली होती. अमृता फडणवीस यांनीही रिट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

निलम गोऱ्हे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं. “रश्मी ठाकरे कधीही गाणे म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधानं करणे यामध्ये पडल्या नाही,” असा सणसणीत टोला निलम गोऱ्हे यांनी यावेळी लगावला.

‘शवसेना’ या शब्दावरून ‘एका शब्दाचे महत्त्व असते’ असे नमूद करतच शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी अमृता यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमृता या शब्दातील ‘अ’ चे भान महत्त्वाचे आहे. अमृताताई आपण या दीपावलीच्या दिवसांत अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही’, असा इशाराच गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, म्हणजे मन:स्वास्थ्य चांगले राहते आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते हे देखील आज विसरू नका, असा टोलाही गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

आपल्या नावात ‘अ’ चं महत्त्व आहे आणि ते निघाले तर ‘मृता’ उरेल, असे नमूद करताना तुम्ही शिवसेनेची काळजी न करता स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपा, असा खरमरीत सल्लाही गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे.

 

News English Summary: Amrita Fadnavis had defected to Shiv Sena. In this tweet, Amrita’s reference to Shiv Sena as ‘Shavasena’ has sparked controversy. The Shiv Sena has responded to Amrita’s remarks in the same language.

News English Title: Shivsena leader Neelam Gorhe slams Amrtuta Fadnavis over twit regarding shivsena party news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x