10 May 2025 1:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

मुंबई पोलीस ऍक्शनमोड'मध्ये येताच | कंगनाची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Bollywood, actress Kangana Ranaut, Rangoli Chandel, Mumbai Police FIR

मुंबई, २३ नोव्हेंबर: समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर व सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिची धावाधाव सुरू झाली आहे. वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पोलीस चौकशीच्या आदेशाविरोधात कंगनानं आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती तिनं याचिकेद्वारे केली आहे.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला आज (23 नोव्हेंबर) वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे होते. कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स (Third Summons) बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, आताही कंगना अनुपस्थितीत राहिल्यास तिला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

News English Summary: Actress Kangana Ranaut, who has been making statements that will create offensive text and social rift on social media, has started running. Kangana has now moved the Mumbai High Court against the police inquiry order issued by the Bandra Magistrate. She has filed a petition seeking quashing of the FIR lodged by the police as per the magistrate’s order.

News English Title: Bollywood actress Kangana Ranaut and Rangoli Chandel moves high court to quash Mumbai Police FIR News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या