जव्हार : भाजपकडून श्रीनिवास वनगाला लोकसभेची उमेदवारी देण्याच निश्चित झाले होत. त्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं होत. परंतु नंतर त्यांनी वनगा परिवार तोडण्याचे पाप केलं आणि त्यांना भाजप विरुद्ध उमेदवारी सुद्धा दिली. त्यामुळे त्याचे फळ शिवसेनेला भोगावेच लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी कधीच कुणाच्या पाठीत वार केला नाही. परंतु शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या काळात मात्र हे काम जोरात सुरु आहे. शिवसेना केवळ वनगा कुटुंबियांच्या अश्रुंचे भांडवल करत आहे असं मुख्यमंत्री शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले.
शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप मुखमंत्र्यांनी केला आहे. शिवसेनेने केलेला हा प्रकार म्हणजे दिवंगत चिंतामण वनगांनी आदिवासींच्या कल्याणासाठी जो आयुष्यभर संघर्ष केला त्याचा अवमान करणारा आहे असं मुख्यमंत्री प्रचारादरम्यान म्हणाले.
