6 May 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

न्यायालयाने समज देऊनही पुन्हा ट्विट | म्हणाली या सरकारपेक्षा बॉलीवूड माफिया, हृतिक रोशन बरे

Actress Kangana Ranaut, compare State government, Aaditya Pancholi, Hrithik Roshan

मुंबई, २८ नोव्हेंबर: बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर  (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला होता. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. काल कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला होता. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.

त्याचवेळी दुसरीकडे कंगनालाही व्यक्ती आणि ठाकरे सरकारविरोधात टीका करण्यास बजावले आहे. कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेनं तोडकाम केले होते. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी न्यायाधीश शाहरुख काथावाला व न्यायाधील रियाझ छागला यांनी कंगनाची सुद्धा कानउघडणी केली होती.

‘मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे’ अशी शब्दांत हायकोर्टाने कंगनाला समज दिला होती. मात्र कंगनाने न्यायालयाने दिलेल्या समजकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे.

कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, गेल्या काही महिन्यात मी महाराष्ट्र सरकारकडून एवढे कायदेशीर खटले, शिव्या, अपमान सहन केला आहे की आता मला बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक चांगले वाटू लागले आहेत. मला माहीत नाही की माझ्यात असं काय आहे की ज्याचा लोकांना इतका राग येतो.

 

 

News English Summary: Kangana tweeted that in the last few months, I have endured so many legal cases, insults, insults from the Maharashtra government that now I feel good about people like Bollywood Mafia, Aditya Pancholi and Hrithik Roshan. I don’t know what is in me that makes people so angry.

News English Title: Actress Kangana Ranaut compare State government with Aaditya Pancholi and Hrithik Roshan news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x