30 April 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत दारुण पराभव | आता म्हणतात केंद्रानेच मला मिशनवर धाडलं

BJP leader Chandrakant Patil, Pune

पुणे, २६ डिसेंबर: नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पुण्यासहीत दारुण पराभव झाला. अगदी त्यापूर्वी भाजप राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चा रंगली आहे. कोथरुडची निवडणूक एवढंच माझं मिशन नाही. कोरोनामुळं काही मर्यादा होत्या. पुण्याचं दिलेलं मिशन पूर्ण होईपर्यंत पुण्यात राहणार. राज्याचा अध्यक्ष असल्यामुळं कुठेही राहू शकतो. गिरीश बापट यांच्या वक्तव्याच्या संदर्भात कोल्हापूरला परत जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. कोल्हापूरला परत जाणार या वाक्यानं हुरळून जाऊ नये किंवा घाबरुन जाऊ नये. केंद्रानं मला दिलेलं मिशन पूर्ण होईपर्यंत पुण्यातच राहणार आहे. (BJP leader Chandrakant Patil says I am here for mission which is given to me by central government news updates)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “माझ्या कोल्हापूरमध्ये परतण्याच्या वक्तव्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. त्यामुळेच मला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. माझ्या त्या वक्तव्याने कुणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरुनही जाऊ नये. मला ते बोलताना इतकी चर्चा होईल असं वाटलं नाही. माझं वाक्य असं होतं की केंद्राने मला दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. केंद्राने मला सहजासहजी असंच पुण्यात पाठवलेलं नाही.”

“माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं. त्यासाठी माशेलकरांना गिरीश बापट यांनी पुणं सेटल होण्यासाठी चांगलं असल्याचा सल्ला दिला. त्यावर मी म्हटलं की पुणं खूप चांगलं आहे. पण मी मिशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या कोल्हापूरला जाईल. त्यासाठी ५,१५ किंवा २० वर्षे असा कितीही वेळ लागू शकतो,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party (BJP) suffered a crushing defeat in the recent graduate and teacher constituency elections in Pune. Earlier, the BJP had said that it would win all the seats in the state. After the statement made by Chandrakant Patil, the discussion has started again. The election of Kothrud is not my only mission. Corona had some limitations. He will stay in Pune till the completion of the given mission.

News English Title: BJP leader Chandrakant Patil says I am here for mission which is given to me by central government news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x