18 November 2019 12:15 AM
अँप डाउनलोड

नांदेड: काँग्रेसचे अशोक चव्हाण पराभूत; भाजपचे चिखलीकर विजयी

Ashok Chavan, Congress, Loksabha Election 2019

नांदेड: लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे प्रतापराव चिखलीकर आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवाचं मूळ कारण ठरलं आहे ते वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतलेली मतं असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे याच लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची चांगली ताकद असताना सुद्धा पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक देखील होणार असल्याने काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Congress(295)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या