15 May 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी
x

चांगलं काम केलं तरी आपलं दुकान बंद होऊ नये म्हणून फडणवीस टीका करतात - गृहमंत्री

home minister Anil Deshmukh, Devendra Fadnavis

पुणे, ०१ जानेवारी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं राजकीय दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमात लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

येरवडा कारागृहबाबत काही विशिष्ट मागण्या होत्या. त्याबाबतचं निवेदन यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे,” अशी माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबई पोलिसांच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचं कर्तव्य केलं. पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. पोलिसांची ही परंपरा १०० ते १५० वर्षांची आहे. त्यामुळंच कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना टोला लगावला.

कोरोना व्हायरसमुळे आपण राज्यातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन केलं. घरातून काम करण्याचे म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले. पण विचार करा जर पोलिसांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर? अजूनही धोका गेलेला नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सर्वच उघडलं तर चुकीचं ठरेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis will criticize even if he does a good job. Maharashtra Home Minister Anil Deshmukh has said that he is criticizing his political shop for not closing it. Anil Deshmukh visited Yerawada Jail in Pune on the occasion of New Year. He was later talking to the media.

News English Title: State home minister Anil Deshmukh slams Devendra Fadnavis over politics news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x