14 December 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

मध्यंतरी काहींनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला | त्यांची तोंडं बंद झाली

CM Uddhav Thackeray, appreciate, state police

मुंबई, ०१ जानेवारी : मध्यंतरी काही लोकांनी राज्यातील पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. पोलिसांची ही परंपरा १०० ते १५० वर्षांची आहे. त्यामुळंच कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना टोला लगावला.

कोरोना व्हायरसमुळे आपण राज्यातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन केलं. घरातून काम करण्याचे म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले. पण विचार करा जर पोलिसांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर? अजूनही धोका गेलेला नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सर्वच उघडलं तर चुकीचं ठरेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण तुमच्या कर्तृत्वाला कशाचीच तोड नाही. ही परंपरा १०० ते १५० वर्षांपासूनची आहे. त्यामुळे कुणीही कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कुणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे”, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

 

News English Summary: Meanwhile, some people tried to defame the police in the state. But now their mouths are closed. Because the work of the police is as clean as the sun. He has no break. This tradition of policing is 100 to 150 years old. That is why no matter how many people clash, they will not be able to tarnish the work of the police, ‘said Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: CM Uddhav Thackeray appreciate state police contribution during covid crisis news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x