CBI अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांची परवानगी न घेतल्यास, क्वारंटाईन अटळ - महापौर
मुंबई, ८ ऑगस्ट : बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार यांचे मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन समाप्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने विनय तिवारीला क्वारंटाईन ठेवण्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर काल त्यांची क्वारंटाईन रद्द करण्यात आले. महानगरपालिकेच्या आदेशानुसार एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्याताना महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, म्हणूनच त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले, असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
त्यानुसार विनय तिवारींना डिस्चार्ज देण्यात आले आहे. ८ ऑगस्ट आधी महाराष्ट्रातून पुन्हा बिहार जावे, अशी सूचनाही पालिकेने त्यांना केली होती. दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने याबाबत केंद्राकडे विचारणा केली. त्यावेळी केंद्र सरकारने स्पष्ट केले की, हा तबास सीबीआयकडे देण्यास काहीही हरकत नाही. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. आता सुशांत प्रकणाचा तपास सीबीआयचे अधिकारी मुंबईत येवून करणार आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. मुंबईत दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. जर ही परवानगी घेतली नाही तर नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईन करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी बजावले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. एसपी विनय तिवारी यांच्याप्रमाणे पुन्हा असा वाद होऊ नये, म्हणून पोलिसांची परवानगी घ्यावी, असे सांगत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची परवानगी घेतली नाही तर यापुढे इतर राज्यातून मुंबईत येणाऱ्यांना नियमानुसार क्वारंटाईन करावे लागेल. मुंबई महापालिकेने १४ दिवसांचा कालावधी क्वारंटाईनचा केला आहे. या नियमानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राहावे लागेल, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.
News English Summary: Mumbai Mayor Kishori Pednekar has already given a clear signal to CBI officials. Those coming to Mumbai from other states have to first get permission from the Mumbai Police. If this permission is not obtained, then as per the rules, quarantine has to be done for 14 days, he has warned in such clear words.
News English Title: CBI officer should seek permission from Mumbai Police otherwise quarantine mayor Kishori Pednekar News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News